PHOTO : महाराष्ट्राच्या चेरापुंजीत आल्हाददायक वातावरण, आंबोलीचा मुख्य धबधबा प्रवाहित
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Jun 2021 12:28 PM (IST)
1
सिंधुदुर्गातील वर्षा पर्यटनाचा मानबिंदू असलेल्या आंबोलीचा मुख्य धबधबा प्रवाहित झाला असून आजूबाजूचे अनेक छोटे मोठे धबधबे सुद्धा प्रवाहित झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोलीत आल्हाददायक वातावरण झालं आहे.
3
महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस आंबोली पडतो त्यामुळे सह्याद्रीच्या कुशीत अनेक छोटे मोठे अनेक धबधबे मनमुराद पणे मुक्त हस्ताने आंबोलीत कोसळत असतात.
4
मात्र आंबोलीतील वर्षा पर्यटनाला याहीवर्षी फटका बसण्याची शक्यता आहे.
5
आंबोलीच्या वर्षा पर्यटनाला सलग तिसऱ्या वर्षी फटका बसणार आहे.
6
2019 मध्ये अतिवृष्टी, गेल्यावर्षी कोरोना आणि यंदाही कोरोनामुळे वर्षा पर्यटन ठप्प आहे.
7
1 जुलैपासून आंबोलीचं वर्षा पर्यटन सुरु करण्याची पर्यटन व्यवसायिकांची मागणी आंबोलीत जोर धरु लागली आहे.