PHOTO: नमन विठुरायाला! चंदन उटी समाप्तीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला मोगरा, गुलाब पुष्पांची आकर्षक सजावट
विठुराया आणि रुक्मिणी मातेला उन्हाळ्याच्या उष्मा दाह सोसावा लागू नये म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरु झालेली चंदन उटी पूजेची आज समाप्ती झाली
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयानिमित्त आज विठ्ठल रुक्मिणी गाभारे मोगरा आणि गुलाबाच्या फुलांनी आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले आहेत .
चंदन उटी पूजा मृग नक्षत्र लागल्यावर बंद करायची परंपरा आहे .
मृग नक्षत्र लागताच पावसाळा सुरु होतो, वातावरणातील उष्म्याची जागा शीतलता घेते म्हणूनच मृग नक्षत्र लागताच चंदन उटी पूजा बंद करायची परंपरा आहे .
या वर्षी कोरोनाने मंदिर बंद असले तरी या सर्व परंपरा पाळण्यात येत आहेत . चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात 13 एप्रिलपासून चंदन उटी पूजेला सुरुवात झाली होती .
आज बरोबर दोन महिन्यांनी 13 जून रोजी शेवटची चंदन उटी पूजा करण्यात आली .
यानंतर पुणे येथील विठ्ठल भक्त राम जांभुळकर यांनी ही फुलांच्या सजावटीची सेवा दिली
आज विठ्ठल रुक्मिणी गाभारा , चौखांबी , सोळखांबी येथे मोगरा , गुलाब , झेंडू , गुलछडी , पासली , शेवंती आणि तगर या फुलांचा वापर करत आकर्षक सजावट करण्यात आली आहे .
उद्या पासून दुपारी पोषाखाच्यावेळी आता चंदन उटी ऐवजी नेहमीचे पोशाख देवाला परिधान केले जातील
या सजावटीने विठुरायाचं मंदिर खुलुन गेलं आहे.