Maharashtra Rain PHOTO: राज्यभरात पावसाचं धुमशान, नद्यांना पूर, अनेक गावं पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
तील बहुतांश भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. राज्यात कोल्हापूर, अकोला, परभणीसह अनेक ठिकाणी पूरस्थिती असून अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुढील पाच दिवस मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज आणि उद्या मुंबईसह राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुण्यातील घाट माथ्यावर अतिवृष्टीचा तर कोल्हापुरातल्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.
मराठवाड्यात देखील पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भातल्या नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे.
मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कसारा घाटात रेल्वे रुळावर दरड कोसळल्यानं लांबपल्ल्याच्या गाड्या रखडल्या आहेत.
पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज आणि उद्या मुंबईसह राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.
पाणी घुसलेल्या ठिकाणी स्थानिक मदत कक्ष किंवा एनडीआरएफच्या टीम्स पोहोचत आहेत
कोकणात पावसाने कहर केला आहे. अनेक बाजारपेठांमध्ये पाणी घुसलं आहे.
राज्यात अनेक तलाव, धरणं ओसंडून वाहू लागली आहेत.