Rain Photo : अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला! मोठं नुकसान
राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट वाढत चाललं असताना दुसरीकडे अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्याच्या मावळ तालुक्यात ही अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीटही झाली. मावळ तालुका हा पर्यटनासाठी ओळखला जातो. त्यात काल सुट्टीचा दिवस असल्याने या गारपिटीचा पर्यटकांनी आनंद घेतला.
बुलडाणा जिल्ह्यामध्ये काल रात्री पुन्हा प्रचंड गारपिटीचा पाऊस कोसळला. यामध्ये जिल्ह्यातील संग्रामपूर तसेच खामगाव अनेक ठिकाणी फळबागासह गहू, हरबरा, उन्हाळी भुईमुग, मका,ज्वारी, आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस झाला. गडहिंग्लज, नेसरी भागात मुसळधार पाऊस झाला आहे तर जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. मुसळधार पावसाने नागरिकांची दाणादाण उडाली तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.
राज्यातील विविध भागात शेतात ज्वारी, गहू , हरभरा, संत्रा, फळभाज्या अशी पीक आहेत. ज्वारी, गहू, हरभरा काढणीला आले आहेत. वादळ, पावसामुळं या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
आज देखील राज्यातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागात आणखी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अजून भर पडली आहे.
विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह राज्यातील अन्य काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या भागातील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.