Meme Competition : एबीपी माझाच्या मीम्स स्पर्धेचा निकाल जाहीर, भन्नाट मीम्स पाहून पोट धरुन हसाल!
एबीपी माझाकडून यंदा पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या मीम स्पर्धेचे देखील निकाल जाहीर करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम पुरस्कार अनिकेत मेढेकर यांना देण्यात आला आहे. या मीममध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या ड्रेसिंग सेन्सवर भाष्य करण्यात आलं आहे. प्रियांकाच्या अवताराचा संदर्भ मीमरनं म्हातारीच्या गोष्टीशी लावला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमीम स्पर्धेचे द्वितीय पुरस्कार ऋतुजा पाटील यांना मिळाला आहे. यात पेट्रोल दरवाढीवर भाष्य करण्यात आलं असून नाना पाटेकर यांचे दोन फोटो वापरत भन्नाट पद्धतीनं दरवाढीवर भाष्य केलंय.
तर तृतीय पुरस्कार फैजल खान आणि क्षितीज वर्मा यांना देण्यात आला आहे. फैजल खान यांनी पंतप्रधान मोदींच्या फोटो काढण्याच्या सवयीवर भाष्य केलं आहे.
तर क्षितीज वर्मा यांनी एका विद्यार्थ्यांच्या व्हायरल फोटोवर मीम बनवलं आहे.