...'तर शेतकऱ्यांसाठी आंदोलन करू', उद्धव ठाकरे घेतायत नगर जिल्ह्यातील दुष्काळसदृश भागांचा आढावा
या दौऱ्याची सुरुवात त्यांनी कोपरगाव तालुक्यातून केली. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील कातरी, संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे, कोपरगाव, संगमनेर आणि पुणतांबा या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमका आणि बाजरीच्या शेतात जाऊन ठाकरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
आज जरी पाऊस सुरू झाला असला तरी या पावसामुळे करपलेली पिकं वाचणार नाहीत, त्यामुळे सरकारनं तात्काळ पंचनामे सुरू करावे अशी मागणी ठाकरेंनी यावेळी केली.
पावसाअभावी पिकं करपून गेली असताना, शेतकऱ्यांना कुणी वाली नाही. घटनाबाह्य सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
लवकरात लवकर शासन दरबारी न्याय मिळावा, दुष्काळ जाहीर होऊन मदत मिळावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.
दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याने शेती पिकांचे मोठं नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
शिवसेना नेहमी बळीराजासोबत आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना धीर दिला
कोणीही धीर सोडू नका, काळजी करू नका, काही दिवसांनी परत येतो, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांनी देत निरोप घेतला.
उद्धव ठाकरे दौऱ्यावर असताना अचानक एका विद्यार्थ्याने ठाकरे यांना शिदोरी भेट दिली.