Maharashtra Rain : मुंबईसह कोकणात पावसाची हजेरी
मुंबईसह कोकणात पावसाची जोरदार हजेरी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत पावसामुळं सखल भागात साचलं पाणी
मुसळधार पावसाचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळं नागरिकांना त्रास सहन करावा लागतच आहे.
तळकोकणातील गर्द वनराईतुन वाहत फेसाळत कोसळणारा सर्वात सुरक्षित सावडाव धबधबा प्रवाहित झाला असून पर्यटकांना आकर्षित करत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा जिल्ह्यात पडत असलेल्या दमदार पावसामुळे प्रवाहित झाला आहे
राज्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळदार पाऊस, काही भागात रस्त खचले
पालघर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून पावसाला सुरुवात, त्यामुळं अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे.
दरम्यान, मुंबईसह उपनगर, ठाणे, पुणे तसेच कोकणातील जिल्ह्यात पावसानं चांगली हजेरी लावल्याचं चित्र दिसत आहे.
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज कोकणात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पश्चिम पुणे जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुण्याच्या लोणावळ्यात तुफान पाऊस कोसळत असल्यानं तिथल्या व्यावसायिकाला मोठा दिलासा मिळाला आहे.