Buldhana Accident : मध्यरात्री अपघात, 25 जणांचा होरपळून मृत्यू, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून घटनास्थळाची पाहणी
महाराष्ट्राची (Maharashtra News) आजची सकाळ अत्यंत दुःखद बातमीनं झाली. नागपूरहून (Nagpur) पुण्याला (Pune) जाणाऱ्या एका खाजगी बसला भीषण अपघात (Accident News) झाला. या बसमध्ये अंदाजे 33 प्रवासी होते. अपघातात 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 8 प्रवासी सुखरुप असल्याचं कळतंय. (PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबसचा हा भीषण अपघात बुलढाणाजवळच्या सिंदखेडराजाजवळील पिंपळखुटा गावाजवळ झाला आहे. नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला. साधारणतः मध्यरात्री 1.30 वाजता हा अपघात झाला. बस सर्वात आधी लोखंडी पोलला धडकली त्यानंतर काही अंतरावर जाऊन बस पलटी झाली आणि बसनं अचानक पेट घेतला, अशी अपघाताबाबत प्राथमिक माहिती मिळत आहे. (PTI)
अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालं. बुलढाण्याचे पोलीस अधिक्षक सुनील कडासने देखील घटनास्थळी उपस्थित होते. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी अपघाताबाबत सविस्तर माहिती सांगितली. (PTI)
बुलढाणा पोलीस अधिक्षक सुनील कडासने यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनाग्रस्त बसमधून आतापर्यंत 25 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. 8 जण या अपघातातून सुखरुप बचावले आहेत. (PTI)
बुलढाणा जिल्ह्यात झालेली अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुख:द आहे. यामध्ये बसने पेट घेतल्यानं 25 जणांचा मृत्यू झाला आहे. आठ लोक जखमी आहेत. मी याबाबत जिल्ह्याधिकारी तेथील पोलिस अधिकारी यांच्याशी बोलत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर चांगले उपचार करण्याच्या सूचना मी दिल्या असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जखमी रुग्णांचा खर्च राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून पाच लाखांची मदत दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. (PTI)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताच्या ठिकाणी पाहणी केली. (PTI)
अपघात झाल्यानंतर तात्काळ त्याठिकाणी यंत्रणा दाखल झाल्या होत्या. पण बसने मोठा पेट घेतल्यानं बसमधील प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. समृद्धी महामार्गावर प्रशासन योग्य त्या उपायोजना करत आहे. काही वेळेला वेगावर नियंत्रण नसल्यानेही अपघात होत आहेत. त्यामुळं वाहनचालकांनी देखील वाहन चालवताना काळजी घेणं गरजेचं असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. (PTI)