Rain : राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी
सध्या राज्यातील काही भागात चांगला पाऊस (Rain) पडत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या कोकण विभागात जोरदार पाऊस सुरु आहे. त्याचबरोबर मुंबईसह उपनगर, ठाणे, नवी मुंबई परिसरात चांगला पाऊस सुरु आहे.
राज्यातील अनेक भागात पावसानं दडी मारल्यानं बळीराजा चिंतेत आहे. अनेक ठिकाणी पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.
विदर्भातील काही जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे माना कुरुमजवळ रेल्वे ट्रॅकवरुन पाणी वाहत असल्याने रेल्वे वाहतूक थांबवली आहे.
पुन्हा एकदा भंडाऱ्यात दमदार पावसानं हजेरी लावली. मागील अनेक दिवसांपासून शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत होता.
भंडाऱ्यात दमदार पावसानं शेतकरी सुखावला असून भात पिकाच्या लागवडीला आता वेग आला आहे.
भंडाऱ्यात जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं वैनगंगा नदी दुथडी भरुन वाहत आहे. नदी काठावरील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मुंबईसह उपनगर ठाणे परिसरात जोरदार पावसाची हजेरी.