ABP C Voter Survey: राष्ट्रवादी कोणाची? अजित दादांची की, थोरल्या पवारांची? सर्वेक्षणाचा निष्कर्ष सांगतो...
अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदासोबतच राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षाच्या अध्यक्ष पदावरही दावा केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशरद पवारांनी मात्र, अजित पवारांचा दावा फेटाळून लावला. दरम्यान, याचसंदर्भात सी-व्होटरनं एबीपी माझासाठी सर्वेक्षण केलं आहे.
तुमच्या मते राष्ट्रवादी कोणाची? अजित दादांची की, थोरल्या पवारांची? हा प्रश्न सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांना विचारण्यात आला. यावर अनेकांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचंच नाव घेतलं. सर्वेक्षणानुसार, 66 टक्के लोकांनी शरद पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचं म्हटलं आहे.
सी-व्होटरच्या सर्वेक्षणात काही लोकांनी अजित पवारांच्या बाजून कौल दिल्याचंही पाहायला मिळालं. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 25 टक्के लोकांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेच राष्ट्रवादीचे खरे प्रमुख असल्याचं म्हटलं आहे.
खरं तर नुकतंच खासदार प्रफुल्ल पटेल यांनी 30 जुलै रोजी झालेल्या बैठकीत अजित पवार यांची आमची नेतेपदी निवड केल्याचा दावा केला होता.
सर्वेक्षणात असेही काही लोक होते ज्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यापैकी कोणाचंही नाव घेतलं नाही. सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार, नऊ टक्के लोकांनी यावर आत्ताच काही बोलू शकत नसल्याचं सांगितलं आहे.
पक्ष फुटलेला नाही, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. विधीमंडळ पक्ष आणि संघटनात्मक घटकांनी 30 जून रोजी एकमताने अजित पवार यांची पक्षाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचंही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. अजित पवार यांच्या नियुक्तीबाबत माहिती देणाऱ्या 40 आमदारांच्या प्रतिज्ञापत्रांसह त्यांनी निवडणूक आयोगाकडे याचिका सादर केली असल्याचंही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
प्रफुल्ल पटेल यांच्या दाव्यावर शरद पवार यांनी पलटवार केला, मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे, असं कोणी म्हणत असेल तर त्याला महत्त्व देऊ नये. मी राष्ट्रवादीचा प्रमुख आहे.
दरम्यान, सर्वेक्षणात राज्यातील 1 हजार 790 लोकांशी बोललं गेलं. सर्वेक्षणातील मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्के आहे.
image 9