Rain : कधी पडणार पाऊस? महाराष्ट्रात सरासरीच्या 23 टक्के कमी पाऊस
सध्या राज्यातील काही भागात पाऊस (Rain) पडत आहे, तर काही भागात पावसानं दडी मारली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहवामान विभागानं दिलेल्या माहितीनुासर महाराष्ट्रात (Maharashtra) सरासरीच्या 23 टक्के कमी पाऊस झाला आहे.
मराठवाड्यातही गंभीर परिस्थिती असून, तिथं सरासरीच्या 38 टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळं राज्यात आणखी चांगल्या पावसाची गरज आहे.
मराठवाड्यात 10 जुलैपर्यंत सरासरी 188 मिमी पावसाची नोंद होत असते. मात्र यावर्षी आतापर्यंत फक्त ११६ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. म्हणजे सरासरीपेक्षा 38 टक्के पाऊस कमी झाला आहे.
राज्यात सर्वात भीषण स्थिती ही हिंगोलीत आहे. हिंगोलीत सरासरीच्या 83 टक्के पावसाची तूट आहे. सरासरी 240 मिमी पाऊस होत असतो. मात्र, फक्त 41.06 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
विदर्भात 10 जुलैपर्यंत 266.09 मिमी पावसाची नोंद होत असते, मात्र फक्त 180 मिमी पावसाची नोंद विदर्भात झाली आहे.
विदर्भातील अकोल्यात सरासरीच्या 68 टक्के कमी पाऊस झाला आहे. 10 जुलैपर्यंत अकोल्यात 209.06 मिमी पावसाची नोंद होत असते. मात्र, आत्तापर्यंत अकोला जिल्ह्यात फक्त 66 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
कोकणात सरासरीच्या एक टक्के पाऊस जास्त झाला आहे. 10 जुलैपर्यंत कोकणात सरासरी 1040 मिमी पाऊस होत असतो. मात्र आत्तापर्यंत कोणतात 1049 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मुंबई शहरात सरासरीच्या 39 टक्के तूट तर रत्नागिरीसारख्या अधिक पाऊस होणाऱ्या जिल्ह्यात 18 टक्के सरासरीच्या कमी पावसाची नोंद बघायला मिळत आहे.