Kolhapur Flood : कोल्हापूरला पुराचा वेढा, शहरात पाणी, 2019 सालची परिस्थिती येण्याची शक्यता, पाहा फोटो
कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. काही गावात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूरला महापुराचा धोका निर्माण झाला आहे. आंबेवाडी, चिखली गावात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे.
शहरातील सुतार माळ परिसरात अनेक घरात पाणी शिरलं आहे. चिखली गावातील लोकांना स्थलांतरित केले आहे.
जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला आहे.
जिल्ह्यातील अनेक गावांसह कोल्हापूर शहरातही पाणी यायला सुरुवात झाली आहे.
पुणे-बंगलोर महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
पंचगंगा नदीची पाणी पातळी 49 फुटांवर आहे, पुढच्या काही वेळात पाणी पातळी 50 फुटांवर पोहोचणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यासाठी NDRFची आणखी एक टीम रवाना झाली आहे.
शहरातील अनेक भागात पाणी यायला सुरुवात झाली आहे.
जोरदार पावसामुळं सांगली आणि कोल्हापूरला यंदाही महापुराचा धोका निर्माण झाला आहे.