Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Guru Purnima 2021 : शिर्डीत 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला आजपासून सुरुवात, मंदिर बंद असल्याने उत्सव साधेपणाने
भारतीयांच्या जीवनात गुरुचे स्थान हे सर्वोच्च असल्याचं समजलं जातं. भारतात गुरुपौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते. शिर्डीत 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज पहाटे काकड आरतीनंतर साई प्रतिमा आणि पोथीची मिरवणूक काढून शिर्डीतील तिन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरूवात झाली.
कोरोना संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी गुरूपोर्णिमा उत्सव भक्तांविना साध्या पध्दतीने साजरा होतोय. मुख्यकार्यकारी अधिकारी के.एच. बगाटे यासह अधिकारी पोथी मिरवणुकीत सहभागी झाले होते.
कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने अद्यापही राज्यातील धार्मिक स्थळे सुरू केलेली नाहीत..मागील वर्षी देखील करोनामुळे साईमंदीर बंद होते तेव्हाही अशाप्रकारे साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला होता.
साईबाबा संस्थानच्या वर्षातील महत्त्वाचा मानला जाणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाला जगभरातील लाखो भाविक साईदरबारी हजेरी लावत असतात.
मात्र मंदिर बंद असल्याने भाविक मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन माघारी परतत आहेत.
साईबाबांना गुरूस्वरूप मानून दरवर्षी लाखो भक्त साईचरणी नतमस्तक होतात मात्र यावेळी मोजके भाविक साईदर्शनासाठी आल्याचं चित्र पहायला मिळतंय.