खासदार गजानन कीर्तिकर यांचा शिंदे गटाला पाठिंबा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश
खासदार गजानन किर्तीकर त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात पक्षप्रवेश केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात पार पडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार आणि कार्यकर्ता मेळाव्यात खासदार गजानन कीर्तिकर यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ हे देखील उपस्थित होते.
आज मुंबईतील दादर माहीम परिसरातील विभाग क्रमांक 10 च्या वतीने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर यांनी एका विशेष मेळाव्याचे आयोजन केले होते.
या मेळाव्यात जनतेच्या साक्षीने महाराष्ट्र राज्याचे कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांनी देखील बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला.
आदित्य ठाकरे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी गेले असतानाच गजानन कीर्तिकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला.
या कार्यक्रमाला खासदार राहुल शेवाळे, शिवसेना उपनेते आमदार सदा सनवणकर शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, तसेच विभाग प्रमुख गिरीश धानुरकर व महिला विभाग संघटिका प्रिया गुरव, शाखाप्रमुख अजय कुसुम, संतोष तेलवणे, अभिजीत राणे,योगेश पाटील,संदीप देवलेकर,मिलिंद तांडेल हेदेखील उपस्थित होते.
रवींद्र नाट्य मंदिरात हा ऐतिहासिक क्षण आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झाले. आज मी शिंदे साहेबांसोबत जात आहे. गेले अडीच वर्षाचे महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे सरकार ठाकरेंचे होते पण चालवत पवार होते, असे कीर्तिकर म्हणाले.
प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक प्रशासन शिवसैनिकांना जुमानत नव्हते. मी ज्येष्ठ असून देखील विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांना मोठी पद दिली. अखेर सर्वांनी बोलून एकनाथ शिंदे सोबत जाण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरेंचा काँग्रेससोबतचा पुढचा प्रवास खडतर आहे त्यामुळे शिवसैनिकांनी उठाव करणं गरजेचं आहे. उद्धवजींनी चुकीच्या माणसांना बाजूला घेतलं. त्यामुळे आज मीही बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आलो आहे, असेही यावेळी कीर्तिकर म्हणाले.