Bharat Jodo Yatra: हातात संविधान, डोक्यावर फुले पगडी; राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला प्रतिसाद, पाहा फोटो
राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील 'भारत जोडो' यात्रा महाराष्ट्रात आहे. आज या यात्रेचा राज्यातील पाचवा दिवस आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज नांदेड जिल्ह्यातील 120 किलोमीटरचे अंतर पार होत असून आज दुपारी चार वाजता यात्रा हिंगोली जिल्ह्यात दाखल होणार आहे.
या यात्रेदरम्यान, सामान्य नागरीक, काँग्रेस कार्यकर्ते यांना राहुल गांधी यांना भेटत आहेत.
या दरम्यान राहुल गांधी यांना भेटवस्तू दिल्या जात आहेत.
भारत जोडो यात्रेदरम्यान नांदेडच्या वाटेवर असताना राहुल गांधी यांना दोन मुलांनी सॉफ्टवेयर इंजिनियर व्हायचे बोलून दाखवले. पण आपण आजपर्यंत संगणक पाहिला व आपल्या शाळेतही नसल्याचे सांगितले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या मुलाला संगणक भेट दिला.
एका व्यक्तीने राहुल गांधी यांना भारतीय संविधानाची प्रत दिली. राहुल यांनी आदरपूर्वक स्वीकार केला.
भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधी यांना एकाने घोंगडी आणि फुले पगडी दिली. राहुल गांधी यांनी त्याचा स्विकार केला.
काहींना आपल्या तक्रारींबाबत राहुल गांधी यांना निवेदन दिले.
राहुल यांनी संवाद साधत सामान्यांची गाऱ्हाणी ऐकून घेतली.