Ajit Pawar : राज्यातील आतापर्यंतच्या 15 उपमुख्यमंत्र्यांची यादी, पाहा फोटो
नाशिकराव तिरपुडे (काँग्रेस) - 5 मार्च 1978 ते 18 जुलै 1978 वसंतदादा पाटील राज्याजे मुख्यमंत्री असताना नाशिकराव तिरपुडे हे उपमुख्यमंत्री होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुंदरराव सोळंके (काँग्रेस)- 18 जुलै 1978 ते 17 फेब्रुवारी 1980 शरद पवार यांनी पुलोदचा प्रयोग केल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी सुंदरराव सोळंके हे उपमुख्यमंत्री होते.
रामराव आदिक (काँग्रेस)- 2 फेब्रुवारी 1983 ते 5 मार्च 1985 वसंतदादा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर रामराव अदिकांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
गोपीनाथ मुंडे (भाजप) - 14 मार्च 1995 ते 18 ऑक्टोबर 1999 राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. त्यावेळी युती सरकारमध्ये भाजपचे गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते.
छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस) - 18 ऑक्टोबर 1999 ते 23 डिसेंबर 2003 काँग्रेसचे विलासराव देशमुख आणि नंतर सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना छगन भुजबळांनी दोन वेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
विजयसिंह मोहिते पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) - 25 डिसेंबर 2003 ते 1 नोव्हेंबर 2004 काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते पाटील हे उपमुख्यमंत्री होते.
आर आर पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) - 1 नोव्हेंबर 2004 ते 8 डिसेंबर 2008 विलासराव देशमुख राज्याचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या आर आर पाटलांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस) - 8 डिसेंबर 2008 ते 7 नोव्हेंबर 2010 अशोक चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांनी तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)- 11 नोव्हेंबर 2010 ते 25 सप्टेंबर 2012 काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) - 7 डिसेंबर 2012 ते 28 सप्टेंबर 2014 काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना अजित पवारांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) - 23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019 भाजपचे देवेंद्र फडणवीसांनी आणि अजित पवारांनी एकत्रित येऊन सत्ता स्थापन केल्याचा दावा केला. त्यावेळी अजित पवारानी तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) - 30 डिसेंबर 2019 ते 29 सप्टेंबर 2022 राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर अजित पवारांना चौथ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली.
देवेंद्र फडणवीस (भाजप) - 30 जून 2022 ते आतापर्यंत शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) - 2 जुलै 2023 पासून आतापर्यंत. देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतीने अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार हे पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले.