Ahmednagar Accident: इथेनॉलनं भरलेला टँकर पलटी झाला अन्...; पाथर्डीतील माणिकदौंडी घाटामध्ये बर्निंग टँकरचा थरार
Ahmednagar Accident: पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी घाटामध्ये इथेनॉलचा टँकर पलटी होऊन पेट घेतला.
Ahmednagar Accident
1/7
या टँकरला लागलेल्या आगीनं रुद्र रूप धारण केलं होतं. तर या आगीत संपूर्ण टँकर जळून खाक झाला आहे.
2/7
या टँकरमधील चार ते पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत.
3/7
जखमींना उपचारासाठी पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
4/7
सुदैवानं या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
5/7
या आगीमुळे वाहतूकही दोन्ही बाजूने बंद झाली आहे.
6/7
पाथर्डी अग्निशामक दलासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ही आग आटोक्यात आणली आहे.
7/7
तर ही घटना नेमकी कशामुळे घडली याचा तपास पोलीस करत आहे.
Published at : 06 Jul 2023 01:55 PM (IST)