रस्ता खराब असल्याने गावातील पोरांना कोणी मुली देईनात; लोकांनी केलं अनोखं आंदोलन; पाहा फोटो
छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील मारोळा गावात गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता खराब झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरस्त्यावर मोठ-मोठे खड्डे झाल्याने पावसाचे पाणी तुंबत आहे. त्यामुळे गावकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
रस्त्यांवर पावसाचे पाणी तुंबत असल्याने, दुचाकी सोडा पायी चालणे देखील अवघड झाले आहे.
गावातून शाळेत जाणाऱ्या शाळकरी मुलांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
रस्त्यावर तुंबलेल्या पाण्यामुळे अनेकदा मोटर सायकल चिखलात अडकतात.
विशेष म्हणजे गावाला जाण्यासाठी रस्ताच नसल्याने मुलांना मुली मिळत नसल्याचा आरोप देखील गावकऱ्यांनी केला आहे.
रस्ता दुरुस्त करण्यासाठी गावकऱ्यांनी अनेकदा प्रशासन आणि नेतेमंडळीकडे मागणी केली. मात्र याचा कोणताही फायदा झाला नाही.
दरम्यान आज गावकऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी तुंबलेल्या पाण्याचे पूजन करून आगळवेगळे आंदोलन केलं.
ठाकरे गटाचे नेते मनोज पेरे यांच्यासह परिसरातील अनेक गावकरी यावेळी उपस्थित होते. तसेच रस्ता लवकर दुरुस्त न झाल्यास मोठं आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.