Ajit Pawar : अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चा, वाचा कोण काय म्हणालं?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते हे भाजपसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअजित पवार (Ajit Pawar) हे महाविकास आघाडीचे आधारस्तंभ आहे. ते आघाडीचे प्रमुख नेते असल्याचे राऊत म्हणाले. अजित पवार यांच्यासंदर्भातील सध्याच्या बातम्या खोट्या आहेत. भाजप अफवा उठवत असल्याचे राऊत म्हणाले.
अजित पवार हे राष्ट्रवादी सोडून भाजप किंवा शिवसेनेत आलेत तर त्यांचं स्वागत आहे. मात्र राष्ट्रवादीचा गट घेऊन ते भाजपसोबत जाणार असतील तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू, असा इशारा शिवसेनेचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी दिला.
अजित पवार यांचं पक्षांतर अटळ आहे. हा राजकीय भूकंप नव्हे तर महा भूकंप होणार : मंत्री गुलाबराव पाटील
नव्या राजकीय समीकरणांच्या फक्त चर्चा आहेत, त्यात काही तथ्य नाही, अशी माहिती अजित पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे संजय राऊत म्हणाले. पण पक्ष फुटला नाही. आजही पक्ष शरद पवार यांच्या नावाशी बांधिल आहे.
अजितदादांसोबत 40 पेक्षा जास्त आमदार असू शकतात, थोड्याच वेळात समजेल: अण्णा बनसोडे
विकास कामांसाठी सत्ताधाऱ्यांसोबत जाणं महत्वाचं, अजितदादा घेतील तो निर्णय मान्य; आमदार नितीन पवारांचं सूचक वक्तव्य
प्रसारमाध्यमांनी राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार धनंजय मुंडेंना All is well आहे का? असा प्रश्न केला होता. त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना Perfectly well असं धनंजय मुंडे म्हणाले.
अजित पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. दादा जिथे जाणार तिथे अण्णा बनसोडे असणार असेही ते म्हणाले.