Eid-Ul-Fitr 2023 : रमजान ईदच्या खरेदीसाठी मालेगावात महिलांची मोठी गर्दी
रमजान महिन्याच्या उत्तरार्धात खरेदीसाठी नाशिकच्या (Nashik) मालेगावात (Malegaon) मुस्लीम महिलांची शहरातील बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरात्रभर खरेदीसाठी दुकानांवर गर्दी होत असल्याने शहरातील किदवाई रोड, गूळबाजार, मुशावर्त चौक, अंजुमन चौक आदी ठिकाणी 'रात्रीचा दिवस' झालेला पाहायला मिळतो.
येत्या शुक्रवारी (21 एप्रिल) रात्री चंद्रदर्शन झाल्यास शनिवारी (22 एप्रिल) रमजान ईद (Eid-Ul-Fitr) असणार आहे. त्यामुळे रमजान ईदच्या खरेदीसाठी महिलावर्ग गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे.
महिला विशेष करुन चपला, कपडे, बांगड्या, ज्वेलरी, नान पाव, कटोरे, शिरखुर्म्याचे साहित्य खरेदी करत आहेत, तर पुरुष वर्ग टोप्या, लुंगी, सुवासिक अत्तर, तयार कपडे आदींना पसंती देत आहे.
खरेदीसाठी मोजकेच दिवस राहिल्याने संध्याकाळ होताच दिवसभर रोजा असलेल्या रोजाधारकांकडून इफ्तारीसाठी फळे आणि खजूर यांची खरेदी केली जाते.
त्यानंतर संपूर्ण रात्र महिलांसह आबालवृद्धासह खरेदीसाठी झुंबड उडत आहे..
शहरात रमजान ईदमुळे रौनक आली असून रात्री विद्युत रोषणाईने सर्वच रस्ते न्हाऊन निघाले आहे. दुकानांवर ग्राहकांची गर्दी होत आहे.
उपवास सोडण्यासाठी लागणारे खजूर आणि फळांची मोठ्या प्रमाणात शहरात आवक झाली असून त्याची सर्वाधिक विक्री मालेगावात होत आहे.
योग्य भाव व उत्तम दर्जा असलेल्या वस्तू खरेदी करायला रमजान काळात एकदा तरी मालेगावात यायलाच हवं.