लाडक्या बहिणींना आता पैसेच पैसे, नेमकं कोणत्या पक्षाने काय आश्वासन दिलं?
दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्यात एका टप्यात विधानसभा निवडणूक (Vidhan Sabha Election 2024) होणार आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) ही योजना केंद्रबिंधु बनली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहायुती सरकारने जुलै महिन्यात ही योजना आणली. आम्हाला महिलांच्या समस्या माहीत आहेत म्हणूनच 1500 रुपये दरमहा देण्याचे ठरवले असं महायुतीच्या नेत्यांनी दावा केला.
ऑगस्ट महिन्यापासून राज्यातील पात्र महिलांचा अकाऊंटमध्ये पैसे क्रेडिट होण्यास सुरुवात झाली होती.
आचारसंहिता लक्षात घेता महायुतीने महिलांना ऑक्टोबर महिन्यातच नोव्हेंबर महिन्याचे पैसे दिले आहेत.
पुन्हा एकदा सत्तेत आलो तर आर्थिक मदत वाढवून मिळेल असं आश्वासन महायुती सरकारने दिले.
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीदेखील महिलांना प्रतिमहिना भरघोस आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.
महाविकास आघाडीने लाडकी बहीण योजनेद्वारे मिळणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्याचे आश्वासन दिले.
तर मविआ 2100, वंचित बहुजन आघाडीने 3500 रुपये आर्थिक मदतीचे आश्वासन दिले आहे.
तर आता लाडक्या बहिणी कोणाच्या पारड्यात मत टाकणार आणि कोणाला सत्तेत बसवणार हे पाहणं म्हत्वाचे ठरणार आहे.