Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gudi Padwa: गुढी पाडव्यानिमीत्त विठू-रखूमाई मंदिर सजले, पाहा विठुरायाचं लोभसवाणं रुप
गुढी पाडवा अर्थात चैत्र प्रतिपदा हिंदू मराठी नवावर्षाच्या पहिल्या दिवसानिमित्त आज विठुरायाच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील भाविक नानासाहेब मोरे पाचनकर यांनी ही फुल सजावटीची सेवा दिली आहे.
या सजावटीसाठी शेवंती 450 किलो, पिंक कन्हेर 40 किलो, अस्तर 40 किलो , झेंडू 100 किलो आणि गुलाब 50 गड्डी वापरण्यात आला आहे.
विठ्ठल चौखंबी , सोळखंबी या ठिकाणी ही सजावट केली आहे .
आजपासून विठुरायाच्या तुळशी अर्चन पूजेस सुरुवात होणार आहे.
या पूजेत उत्सव मूर्तीवर तुळशी अर्चन पूजेचा संकल्प करून या पूजेतील कुटुंबाला देवाच्या पायावर तुळशी अर्पण करता येणार आहे.
यामुळे या कुटुंबाना देवाची पूजा तर करता येईल शिवाय विठुरायाच्या चरणावर तुळशी देखील अर्पण करता येणार आहेत.
या पूजेसाठी एका कुटुंबाला 2100 रुपये मंदिर समितीकडे भरावे लागणार असून देवाची पूजा , दर्शन आणि प्रसाद असा तिहेरी लाभ या भाविकांना मिळणार आहे
सध्या रोज 30 पूजा होणार असल्या तरी भाविकांची मागणी वाढल्यास पूजेची संख्या देखील वाढवली जाणार आहे.
सर्वसामान्य भाविकांच्या दर्शन रांगेत कोणतीही अडचण येणार नसली तरी तथाकथित व्हीआयपी दर्शनाला मात्र चाप बसून मंदिराच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल