Gudi Padwa 2023: तुळजाभवानी मंदिराच्या कळसावर उभारली गुढी; गुढीपाडव्यानिमित्त देवीची अलंकार पूजा
गुढीपाडव्यानिमित्त प्रत्येकजण येणाऱ्या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी तयारी करत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात परंपरेनुसार गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला.
साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी आजचा एक मुहूर्त असल्यानं आणि मराठी नवीन वर्षाचा पहिलाच दिवस असल्यानं देवीची अलंकार पूजा करण्यात आली.
देवीची पहाटे आरती करुन तुळजाभवानी मातेच्या मंदिरावर गुलाबी रंगाच्या साडीची गुढी उभारून भगवा ध्वज लावण्यात आला.
तुळजाभवानी मातेचे मुख्य पुजारी महंत तुकोजी बुवा, वाकोजी बुवा यासह पुजारी भक्तांच्या उपस्थितीत गुढी उभारली.
गुढी उभारल्यानंतर देवीला साखरेचा हार अर्पण करण्यात आला.
तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळत आहे.
प्रत्येकजण आनंदाची, सुखसमृद्धी, आणि भरभराटीची गुढीही उभारतायत.तर कुणी पारंपरिक पोषाखात शोभायात्रांमध्ये सहभागी होत आहेत.
या शोभायात्रेमध्ये प्रत्येकजण आनंदाने, अभिमानाने सहभागी होत आहेत.
मुंबईसह पुणे, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या अनेक शहरांमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळत आहे.