Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंच्या जाहिरातीत दुरूस्ती, आता फडणवीस आणि बाळासाहेबही दिसले
‘देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे सरकार’असं शीर्षक असलेल्या जाहिरातीवरून वाकयुद्धाला सुरूवात झाली होती. यावरून राष्ट्रवादीसह अन्य विरोधी पक्षांचं असं म्हणणं आहे की, भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात सर्व काही सुरळीत चालले नसल्याचं दिसून येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, या सर्व गदारोळात शिंदे गटाकडून नव्याने जाहिरात देण्यात आली होती. तरी हे प्रकरण काही थांबत नाहीय. या नवीन जाहिरातीत देवेंद्र फडणवीस, बाळ ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरू आनंद दिघे दिसून येत आहेत.
पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोघांतील अंतर वाढत असल्याचं दिसत आहे. याचं कारण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला फडणवीस उपस्थित राहिले नव्हते. याशिवाय मंगळवार, 13 जून 2023 रोजी कोल्हापुरात झालेल्या कार्यक्रमातही ते सहभागी झाले नव्हते.
संजय राऊत यांनी जाहिरातीत बाळ ठाकरे यांचा फोटो नसल्यामुळे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला 'मोदी-शहांची शिवसेना' असल्याचं म्हटलं आहे. यावरून बुधवार, 14 जून रोजी शिंदे यांच्या मनात काय आहे ते यातून दिसतं, असं त्यांनी नव्या जाहिरातीवर म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले की, शिंदे आणि भाजपचे सरकार पत्त्याच्या बंगल्यासारखे पडणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय की, सर्वेचा सॅम्पल साईज काय आहे हे मला समजलं नाही. त्या पुढे म्हणाल्या की, वर्तमानपत्रांमध्ये कोटींच्या जाहिराती देणारा हिंतचितक कोण आहे, याचा मी शोध घेत आहे. मला वाटतं की, आजची नवीन जाहिरात दिल्लीवरून आली आहे.
या जाहिरातीत असा दावा करण्यात आला होता की,मुख्यमंत्रीपदासाठी केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील 26.1 टक्के लोकांनी एकनाथ शिंदे आणि 23.2 टक्के लोकांनी देवेंद्र फडणवीस यांना पसंती दिली आहे. या सर्वेत असं सांगण्यात आले आहे की,महाराष्ट्रातील 49.3 टक्के लोक भाजप आणि शिवसेना युतीला पसंती देत आहे.
या जाहिरातीनुसार, महाराष्ट्रातील 30.2 टक्के लोक भाजपला पसंती देतात,तर 16.2 टक्के लोक एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला पसंती देतात.
ही आकडेवारी पाहिली तर असं दिसून येतं की, महाराष्ट्रातील 46.4 टक्के लोक राज्यातील विकासासाठी भाजप आणि शिवसेना युतीवर विश्वास आहे.