In Pics: सोलापुरमध्ये कृषी प्रदर्शनात दीड कोटीचा रेडा, बेळगावमधील शेतकऱ्याच्या रेड्याची जोरदार चर्चा
सोलापुरमध्ये सिद्धेश्वर देवस्थानाकडून कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबेळगावमधील शेतकऱ्याच्या रेड्याची जोरदार चर्चा सुरू झाली. हरियाणातल्या मंडळींनी दीड कोटीत विकत घेण्याची दाखवली तयारी दाखवली आहे.
हा रेडा पाच वर्षाचा आहे. या रेड्याला हरियाणातल्या काही मंडळींनी दीड कोटी रुपये देऊन विकत घेण्याची तयारी दाखवली आहे.
छोट्या हत्ती सारखा दिसणारा हा रेडा रोज 10 लिटर दूध पितो.
त्याचा रोजचा व्यवस्थापनाचा खर्च सुमारे दोन हजार रुपये आहे
या रेडयापासून मालकाला रोज किमान दहा हजार रुपये उत्पन्न सुद्धा मिळते
कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील मंगसुळीच्या विलास गणपती नाईक या हौशी पशुपालकाने हा रेडा पाळला आहे.
पाच वर्षांपूर्वी विलास नाईक यांनी चक्क हरियाणात जाऊन एक मुरा जातीची म्हैस 1 लाख 40 हजार रुपयांना खास पालनासाठी गावी आणली होती
या म्हशीपासून या गजेंद्र रेड्याचा जन्म झाला. त्याला दीड कोटीची मागणी आली आहे.
परंतु यापेक्षा अधिक किंमत ज्या ठिकाणी येईल त्याच ठिकाणी गजेंद्रला विकणार असल्याचे गजेंद्रचे मालक विलास नाईक यांनी सांगितले.