PHOTO: साऊथचा दिग्दर्शक विठ्ठल भेटीनं भावूक! 21 लाखांची देणगी विठुराया चरणी अर्पण

साऊथच्या दिग्दर्शकाचं विठुरायाला साकडं; 21 लाखांची देणगी विठ्ठल चरणी अर्पण
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पंढरीच्या विठुरायाच्या चरणी भेदाभेद अमंगळ असतो. इथं गरीबातला गरीब ते अतिश्रीमंत माणून भक्तिभावानं माथा टेकतो.

मूळचा पंजाबी असणाऱ्या आणि दाक्षिणात्य चित्रपटाची निर्मिती करणारा अभिनेता विष्णू हरी सिंह याने विठुरायाचं दर्शन घेतलं.
नवीन वर्षाला विठ्ठल चरणी अर्पण 21 लाखांची देणगी अर्पण केली.
मूळचा पंजाब येथील मोहालीचा असणारा विष्णू सिंह याने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांची निर्मिती करताना त्यात अभिनय देखील केला आहे.
काल पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या विष्णू यांनी देवाला पाहिल्यावर भावूक होत थेट 21 लाखांचा धनादेश मंदिर समितीकडे सुपूर्द केला .
यानंतर मंदिर समितीच्या वतीने सदस्य संभाजीराजे शिंदे यांनी त्यांचा सत्कार केला .
विठुरायाच्या दर्शनासाठी आता दक्षिण भारतासोबत उत्तर भारतीयांच्या संख्येत देखील दिवसेंदिवस मोठी वाढ होत असून या भाविकांमुळे देवाचा खजिना समृद्ध बनत आहे .