In Pics : अग्निवीरांची पहिली तुकडी पूर्व प्रशिक्षणासाठी कामठी येथे दाखल!
कामठी येथील गार्ड्स रेजिमेंट सेंटरवर अग्निवीर दाखल झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय सेनेसोबत प्रत्यक्ष प्रशिक्षण सुरु करण्यापूर्वी या केंद्रात सहा महिने प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
देशभरातील अग्निवीरांच्या विविध निवड केंद्रातून निवड झालेले 112 अग्निवीर कामठी येथील केंद्रात 25 ते 31 डिसेंबर दरम्यान दाखल झाले आहेत.
या प्रशिक्षणात उमेदवारांना शस्त्र हाताळण्याचेही विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
सहा महिन्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर हे अग्निवीर भारतीय सैन्यासाठी विशेष प्रशिक्षण घेण्यासाठी पाठविण्यात येईल.
हा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर या अग्निवीरांची पुढील प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमात शारीरिक ट्रेनिंगसह मानसिक तयारीही करण्यात येईल.
कामठी येथील गार्ड्स रेजिमेंट केंद्रांवर दाखल होणारी ही पहिली तुकडी आहे.
प्रशिक्षण केंद्रावर दाखल झालेले सर्व 112 अग्निवीर सहा महिने याच केंद्रावर निवासी प्रशिक्षण घेणार आहेत.
सहा महिन्याच्या प्रशिक्षणात शारीरिक, मानसिक तयारीसह युद्ध कौशल्यातही अग्निवीरांना ट्रेन करण्यात येणार आहे.