Pune NCP News: पुण्यात राष्ट्रवादीने फोडली 'महागाईची दहीहंडी'
राज्यात दहीहंडी मोठ्या जल्लोषात साजरी होणार आहे. मात्र सध्या देशात महागाई वाढत आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. यासाठी पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी महागाईची दहीहंडी फोडली आहे. .
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहागाईला विरोध करण्यासाठी त्यांनी दहीहंडी फोडत मोठ्याने घोषणाबाजी केली.
पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यलयासमोर त्यांनी दहीहंडी उभारुन हे आंदोलन केलं आहे.
सध्या राज्यासह देशभरात महागाईमुळे जनता त्रस्त आहे. त्यामुळे ही महागाई कमी करा आणि जनतेला दिलासा द्या, या कारणासाठी नेहमीच पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्ये रस्त्यावर आंदोलन करत असतात.
ही दहीहंडी फोडणाऱ्याला 15 लाख रुपये देणार असल्याचं सांगितलं आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपुर्वी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करणार होते त्यामुळे मोदींच्या स्वप्नातली दहीहंडी फोडण्यासाठी पुणेकरांना बोलावलं आहे.
जनतेनं फक्त स्वप्नात जगण्याचं स्वप्न नरेंद्र मोदी दाखवत आहेत.
दहीहंडीत 15 लाखांचे चेक ठेवण्यात आले होते.
प्रत्यक्षात बेरोजगारी आणि महागाईकडे दुर्लक्ष करताना दिसत असल्याचे आरोप राष्ट्रवादीचे पुण्याचे शहरप्रमुख प्रशांत जगताप यांनी केला आहे.