Nashik Cold : गुलाबी थंडी, दाट धुके अन् विस्तीर्ण गोदेचा काठ, हे निसर्गसौंदर्य पाहून तुम्हीही प्रेमात पडाल!
नाशिकच्या निफाड तालुक्यातील चांदोरी सायखेडा परिसरात वाढत्या थंडीमुळे सकाळी असा सुंदर नजारा पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोदावरीच्या नदीच्या काठावर निफाड तालुक्यातील चांदोरी सायखेडा ही गावे वसलेली असून या ठिकाणी थंडीचा जोर वाढू लागला आहे. शिवाय सकाळच्या सुमारास येथील आल्हाददायक वातावरण पर्यटकांना खुणावत आहे.
ज्या ठिकाणी गोदावरी नदी चंद्राकार प्रवाह धारण करते ते ठिकाण म्हणजे चांदोरी. चंद्रावतीचा अपभ्रंश होऊन चांदोरी हे नाव पडले. हिवाळ्यात पडणारे धुके, संथ वाहणारी नदी, पक्षांची किलबिलाट यामुळे वातावरण अधिकच रमणीय होऊन जाते.
सूर्य जसजसा पूर्वेकडून पश्चिमेकडे येतो तसतशी मंदिरांची शिल्पशैली बदलत गेली.पर्यटक,हौशी छायाचित्रकार यासाठी हे गोदाकाठ नक्कीच एक डेस्टिनेशन असेल.
नाशिकमध्ये अक्षरशः थंडीची लाट आली असून, निफाडचा पारा पुन्हा एकदा घसरून थेट साडेआठ अंशावर गेला आहे. निफाडचे किमान तापमान 8.5 अंश सेल्सिअसवर गेले आहे. त्यामुळे निफाडकरांना हुडहुडी भरली आहे.
थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. उबदार कपडे परिधान करून नागरिक गरम पदार्थांवर ताव मारताना दिसत आहेत.
नाशिकमध्येही तापमान जवळपास 10 अंशांपर्यंत घसरले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या थंडीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हवेतील गारव्यामुळे निफाड, लासलगाव, पिंपळगाव बसवंत ,ओझर, सायखेडा, चांदोरी गारठून निघाले आहे. ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून नागरिक शेकत बसत आहेत.
नाशिकच्या निफाड तालुक्यातील चांदोरी सायखेडा परिसरात वाढत्या थंडीमुळे सकाळी असा सुंदर नजारा पाहायला मिळत आहे. (फोटो क्रेडिट : सागर आहेर, चांदोरी)