Hingoli Rail Roko: रेल्वेवर चढून हिंगोलीकरांचं आंदोलन, पहा फोटो
हिंगोलीहून मुंबईसाठी रेल्वे फेरी सुरू करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून रेल्वे संघर्ष समिती, व्यापारी आणि हिंगोलीकर प्रशासन दरबारी करत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया मागण्याकडे प्रशासन दुलर्क्ष करत असल्याने आज रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले.
सकाळी नऊ वाजता सर्व आंदोलक हे गांधी चौकामध्ये एकत्र झाले.
पुढे गांधी चौकातून निघालेला मोर्चा हिंगोली रेल्वे स्थानकावर जाऊन धडकला.
रेल्वे स्थानकावर येताच आंदोलकांनी प्रशासनाच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी सुरु केली.
यावेळी आंदोलनामध्ये विविध संघटना आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी सहभाग नोंदवला.
यावेळी पोलिसांनी आंदोलकांना आडविण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक थेट रेल्वे रुळावर पोहोचले.
तर रेल्वे स्थानकावर आलेली अमरावती तिरुपती एक्सप्रेस आंदोलकांनी रोखून धरली.
विशेष म्हणजे रेल्वेच्या इंजिनवर चढून आंदोलकांनी घोषणाबाजी केल्याने पोलिसांची धावपळ उडाली.