PHOTO: पलटी झालेल्या टँकरमधून गोडतेल पळवून नेण्यासाठी नागरिकांची गर्दी

समोरील वाहनाला वाचवण्याच्या नादात टँकर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि तेलाने भरलेले हे टँकर रस्त्याखाली जाऊन उलटले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी मदत न करता टँकरमधून वाहून जाणारे तेल घेऊन धूम ठोकली.

टँकर पलटी झाला असल्याची माहिती काही क्षणात परिसरात पसरली.
त्यामुळे या भागातील रजापूर, थापटी, आडूळ, देवगाव आदी आसपासच्या गावातील काही लोकांनी टॅकरच्या दिशेने धाव घेत तोबा गर्दी केली.
प्रत्येकजण मिळेल ते भांडे, पाण्याच्या टाक्या, डबे, पाण्याचे जार, बादल्या तर कुणी पातेले घेऊन टॅकरच्या दिशेने धावत होते.
फुकटचे तेल मिळविण्यासाठी जणू स्पर्धा लागली होती.
प्रत्येकजण आपापली भांडी भरण्यात व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत होते.
त्यातच काहींनी तर अक्षरशः वाहून जाणारे मातीमिश्रित तेलही भरून नेले.
तेल नेण्याऱ्याच्या दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या.
अगदी लहानग्यापासून वयोवृद्धांपर्यंत अन् पुरुषांपासून महिलांपर्यंत सर्वांनीच जास्तीचे तेल आपल्या भांड्यात कसे पडेल यासाठी कसरत करत होते.
तर याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलच्या कॅमऱ्यात कैद केला.