पाहा फोटो: वालधुनी नदीला सप्त रंगी साड्या अर्पण करून पूजा; महाराष्ट्रात पहिल्यांदाच नदीची पूजा
अजय शर्मा एबीपी माझा
Updated at:
28 May 2022 09:26 AM (IST)
1
अंबरनाथ तालुक्यातील तावली डोंगरातून उगम पावणार्या वालधुनी नदीचे आगळ्या वेगळ्या पद्धतीने पूजन करण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सात विविध रंगांच्या साड्या वालधुनी नदीला प्रतीकात्मकपणे अर्पण करून नदीचे पूजन करण्यात आले.
3
अशा प्रकारे नदीचे पूजन ही महाराष्ट्रातील पहिली घटना असेल.
4
वरूण राजाने कृपादृष्टी करावी आणि शेतकऱ्याची शेती सुजलाम सुफलाम करावी यासाठी नदी मातेचे पूजन करून तिला या माध्यमातून साकडं घातलं जातं.
5
अंबरनाथ तालुक्यातून उगम पावणारी ही नदी अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याण शहरतुन वाहते आणि पुढे खाडीला मिळते.
6
एरवी दुथडी भरून वाहणारी ही नदी प्रदुषणामुळे शेवटची घटका मोजत होती.
7
मात्र आता गेल्या १०५ दिवसांपासून अंबरनाथ नगरपरिषद आणि काही सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन नदीची स्वच्छता हाती घेतला आहे.