PHOTO : मिरजेत फार्म हाऊसवरून 23 किलो गांजा जप्त, पुणे सीमा शुल्क विभागाची कारवाई
कुलदीप माने, एबीपी माझा
Updated at:
27 May 2022 09:33 PM (IST)
1
मिरज तालुक्यातील वड्डी येथील एका फार्म हाऊसवरून 22.85 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पुणे सीमा शुल्क विभागाने ही धडक कारवाई केली आहे.
3
याप्रकरणी एकाला अटक देखील करण्यात आली असून या कारवाई बाबतची माहिती पुणे सीमा शुल्क विभागाने ट्विटरवरून प्रसिद्ध केली आहे.
4
या कारवाईबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती.
5
ज्या व्यक्तीच्या फार्महाऊसवर हा छापा पडला तो व्यक्ती मिरजेतील एक नामांकित बिल्डर असल्याची माहिती आहे.
6
या बिल्डरवर या आधी सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
7
नार्कोटिक्स सेल आणि पुणे कस्टमच्या विशेष गुप्तचर अधिकार्यांनी ही कारवाई केली.
8
दरम्यान, या पथकाने काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली असून या छाप्यांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.