PHOTO : जागतिक वारसास्थळ दर्जा मिळण्यासाठी कोकणातील कातळशिल्प युनेस्कोच्या प्रस्तावित यादीत!

Konkan Katalshilp

1/5
कोकणातील सड्यांवर असलेली कातळशिल्प म्हणजे मानवी उत्क्रांतीच्या अभ्यासकांसाठी महत्त्वाची बाब. शिवाय, पर्यटकांसाठी देखील ही कातळशिल्प आकर्षण ठरत आहेत.
2/5
दरम्यान, याबाबत आता युनेस्कोचा एका निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. कातळशिल्पांचं संवर्धन आणि कोकणातील पर्यटनातून होणाऱ्या रोजगार निर्मितीसाठी देखील त्याचा हातभार लागणार आहे.
3/5
हिच कातळशिल्प आता युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ दर्जा मिळण्यासाठी युनेस्कोच्या प्रस्तावित यादीमध्ये दाखल झाली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील 7, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1 आणि गोवा राज्यातील एका ठिकाणाचा यामध्ये समावेश आहे. युनेस्कोच्या संचालकांनी याबाबचतचं माहिती पत्र भारतीय दुतावासास पाठवलं आहे.
4/5
रत्नागिरी जिल्ह्यातील उक्षी, जांभरुण, कशेळी, रुंढेतरी, देविहसोळ, बारसू, देवाचे गोठणे तर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडोपी आणि गोवामधील फणसामाळ येथील कातळशिल्पांच्या यामध्ये समावेश आहे.
5/5
रत्नागिरीमधील निसर्गयात्री संस्था मागील 10 वर्षे पेक्षा देखील अधिक काळ यासाठी प्रयत्नशील आहेत. आतापर्यंत त्यांनी 71 पेक्षा जास्त सड्यांवरील जवळपास 1700 पेक्षा देखील जास्त कातळशिल्प जगासमोर आणली आहेत.
Sponsored Links by Taboola