Statue of knowledge at Latur : लातूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 70 फुटी पुतळ्याचं लोकार्पण
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त लातुरात बाबासाहेब यांच्या भव्यदिव्य पुतळ्याचे अनावर करण्यात आलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबाबासाहेबांच्या 70 फुटी ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’पुतळ्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण पार पडलं.
राज्यमंत्री संजय बनसोडे, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, भाजप नेते गिरीश महाजन उपस्थित होते.
लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या संकल्पनेतून पुतळ्याच्या उभारणीचा संकल्प करण्यात आला.
जवळपास 50 कारागीरांनी 20 दिवस 24 तास काम करत पुतळा पूर्ण केला आहे.
पुतळा तयार करण्यासाठी 1400 किलो स्टील, 1400 किलो पीओपी, 3570 किलो फायबर आणि 200 लिटर पेंट वापरले गेले आहे.
50 पेक्षा जास्त कारागीर 20 दिवस 24 तास काम करत होते. त्यानंतर ही भव्यदिव्य प्रतिमा साकारली आहे.
राज्यातील सर्वात उंच पुतळा म्हणून याची नोंद होणार आहे अशी माहिती खासदार सुधाकर तुकाराम श्रृंगारे यांनी दिली आहे
राज्यातील सर्वात उंच पुतळा म्हणून याची नोंद होणार आहे अशी माहिती खासदार सुधाकर तुकाराम श्रृंगारे यांनी दिली आहे
लातूर जिल्ह्यातूनच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोकांची गर्दी होण्याचा अंदाज लक्षात घेऊन व्यवस्था करण्यात आली आहे