दिल्लीत शरद पवारांच्या घरी सर्वपक्षीयांसोबत स्नेहभोजन, नितीन गडकरी, संजय राऊत यांचीही उपस्थिती
दिल्लीत शरद पवारांच्या घरी आज सर्वपक्षीय आमदारांना स्नेहभोजन आयोजित करण्यात आलंय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाविकासआघाडी सोबतच भाजपच्या आमदारांनाही आमंत्रण देण्यात आले आहे
विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही शरद पवारांनी आमंत्रण दिलंय.
स्नेहभोजनासाठी नितीन गडकरी देखील यावेळी उपस्थित होते.
त्यामुळे शरद पवार, संजय राऊत यांच्या उपस्थितीत पवारांच्या दिल्लीतल्या घरी आज राज्यातील सर्वपक्षीय आमदारांचं स्नेहभोजन होणार आहे.
शरद पवार यांच्या घरी संजय राऊत देखील उपस्थित आहेत.
राज्यातले अनेक आमदार आज 6 जनपथवर जेवणासाठी उपस्थित होते.
सध्या राज्यातले सर्वपक्षीय आमदार एका प्रशिक्षणासाठी नवी दिल्लीत आहेत.
मात्र, त्यांच्या प्रशिक्षणाऐवजी शरद पवारांच्या घरी स्नेहभोजनाचीच जास्त चर्चा सुरु आहे.
संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई झाल्यानंतर या सोहळ्याला पवार, गडकरी, संजय राऊत एकत्र आले आहे.