PHOTO: फटाक्यांचे दर 30-40 टक्क्यांनी वाढले, पण बाजरातील गर्दी कायम
तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त फटाक्यांचे बाजार फुलले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे फटाके घेणाऱ्यांची गर्दी देखील पाहायला मिळत आहे.
मात्र यावेळी गेल्यावर्षीपेक्षा 30 ते 40 टक्क्यांनी फटाक्यांचे दर वाढले आहेत.
औरंगाबादच्या फटाके बाजारात कोंबडी फटका पाकीट 30 रुपयाला मिळत असून, गेल्यावर्षी 20 रुपयाला होता.
सुतळी बॉम्बचा पाकीट 60 रुपयला मिळत असून, गेल्यावर्षी 50 रुपयाला होता.
जमिनीवर फिरणारी चक्कर पाकीट 180 ते 200 मिळत असून, गेल्यावर्षी 120 ते 150 रुपायाला होते.
झाड 300 रुपयांना बॉक्स असून, गेल्यावर्षी 230 ला मिळत होते.
छोटा रॉकेट 80 रुपयाला पाकीट असून, गेल्यावेळी 50 रुपयाला होते.
सुरसुरीचा बॉक्स 100 रुपयाला असून, ज्यात छोटे-छोटे 10 पुडे येतात.
पाच हजार फटाक्यांची मोठी लड 1200 रुपयांपर्यंत मिळत असून, गेल्यावर्षी 800 रुपयांना मिळत होती.