PHOTO: राज्यपालांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक
छत्रपती शिवाजी महराजांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या राज्यपालांच्या विरोधात औरंगाबादमध्ये आंदोलन करण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबादच्या क्रांती चौकात आंदोलन करण्यात आले.
यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह मराठा संघटनांची उपस्थिती पाहायला मिळाली.
यावेळी राज्यपाल यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
राज्यपाल यांनी तत्काळ माफी मागावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
तसेच नेहमी वादग्रस्त विधान करणाऱ्या राज्यपालांना केंद्राने परत बोलवून घेण्याची मागणी देखील यावेळी केली गेली.
तसेच 'कोश्यारी हायहाय' अशा घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या.
यावेळी आंदोलकांनी जालना रोडवर रास्तारोको करण्याचा देखील प्रयत्न केला.
आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले.