PHOTO: औरंगाबादच्या सोयगावात 'पांढऱ्या सोन्या'वर चोरट्यांचा डल्ला
बाजारात आवक कमी झाल्याने कापसाला चांगला भाव मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे शेतकऱ्यांचं पांढरं सोनं आता चोरट्यांचे लक्षावर आहे.
सोयगाव तालुक्यात एका शेतकऱ्याचा 17 क्विंटल कापूस चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे.
सोयगाव शिवारातील शेतकरी दत्तात्रय महादू आस्वार यांनी शेतीमाल उत्पन्नाचा माल ठेवण्यासाठी शेतात पत्र्याचे शेड तयार केलेले आहे.
दरम्यान याच शेडमध्ये त्यांनी शेतातील वेचणी करून ठेवलेला 25 क्विंटल कापूस साठवून ठेवला होता.
चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री शेडचे कुलूप, कोयंडा तोडून आत प्रवेश करून शेडमधील वेचणी करून ठेवलेल्या कापसापैकी एक लाखाचा 17 क्विंटल कापूस वाहनात भरून चोरून नेला.
यावेळी श्वान पथकाला देखील घटनास्थळी घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.
याप्रकरणी सोयगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.