PHOTO: नुकसानभरपाईच्या मागणीसाठी आमदार कैलास पाटलांचे आमरण उपोषण
उस्मानाबादेत सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे.
याच मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
शेतकऱ्यांची दिवाळी कडू करणाऱ्या सरकारची दिवाळी गोड होऊ देणार नाही असे कैलास पाटील म्हणाले.
उस्मानाबाद जिल्हयातील शेतकऱ्यांच्या हक्काचा पीकविमा, अनुदान आणि ओला दुष्काळ जाहीर करावा: कैलास पाटील
आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणाला अनेक ग्रामपंचायतीने पाठींबा दिला आहे.
याचवेळी आम आदमी पक्षाने देखील त्यांच्या उपोषणाला पाठींबा दिला आहे.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि पदाधिकारी यांची देखील उपस्थिती पाहायला मिळत आहे.