PHOTO: शेतकऱ्यांनी स्मशानभूमीत साजरी केली 'दिवाळी'
अशातच शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असतांना सरकारकडून फक्त घोषणा केल्या जात असल्याचा आरोप केला जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी चक्क स्मशानभूमीत दिवाळी साजरी करत अनोखं आंदोलन केला आहे.
औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले आहे.
नुकसानभरपाईच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज गावातील स्मशानभूमीत दिवाळी साजरी करत अनोखं आंदोलन केलं.
अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कोणतीही शासकीय यंत्रणा पोहोचली नसल्याचा शेतकऱ्यांनी यावेळी आरोप केला.
त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कोणतीही भरीव मदत मिळत नसल्याचे चित्र आहे.
अशात दिवाळी सारखा सण आला आहे, मात्र आमच्याकडे यासाठी पैसे नसल्याचं शेतकरी म्हणाले.
त्यामुळे गावातील सर्व शेतकरी आज स्मशानभूमीत दिवाळी साजरी करत असल्याचं निवेदनात म्हंटल आहे.