PHOTO: विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी
दानवे यांनी पुण्यासह अहमदनगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी दानवे यांनी पुणे हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील पाटील वस्तीतील शेतकऱ्यांच्या घरात व शेतात पाणी शिरल्याने झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
यावेळी अधिकाऱ्यांना याला जबाबदार असणाऱ्या अतिक्रमणाविरोधात त्वरित कारवाई करून दंड आकारून कारवाईचे निर्देश दिले.
याचवेळी त्यांनी पेरणी येथील अतिवृष्टी व पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली.
शेतातील साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्गच नसल्याने तिथे मार्ग करण्याबाबत उपाययोजना करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
दरम्यान दानवे यांनी शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई गावात वाहून गेलेल्या घरांची पाहणी केली.
संसार उघड्यावर आल्याने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
तसेच शनी शिंगणापूर येथील शेतकरी पंढरीनाथ दत्तात्रय बानकर यांच्या शेतावरील बांधावर जाऊन पावसामुळे झालेल्या कपाशीची पाहणी केली.