Aurangabad: नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या 'केळी'तून लाखो रूपयांचा नफा, पहा फोटो
आजकाल बाजारात केमिकल टाकून पिकवलेली केळी मोठ्याप्रमाणावर येतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशात औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील कडेठाणमधील उच्चशिक्षित शेतकरी अनिल विक्रम ढाकणे यांनी नैसर्गिक पद्धतीने केळी पिकवल्याचा प्रयोग केला आहे.
ढाकणे यांनी दिड एकरमध्ये नैसर्गिक पद्धतीने केली पिकवून लाखो रूपयांचा नफा मिळविला आहे.
अनिल ढाकणे यांना वडिलोपर्जित पाच एकर शेती असून, ज्यात दिड एकर केळीची लागवड केली आहे.
ढाकणे यांनी केळीची सहा बाय सहा वर दीड एकरमध्ये लागवड केली आहे.
ज्यासाठी त्यांनी केळीचे जी-9 टिशू कल्चरल वाण आणले होते.
मशागतीसह लागवडीकरिता त्यांना जवळपास एक लाख रूपयांवर खर्च आला.
झाडांना पाणी देण्याकरिता त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला.
सध्या ही झाडे 12 ते 18 फुटापर्यंत वाढली आहे.
केळीच्या या पिकातून त्यांना चार लाख रूपये निव्वळ नफा अपेक्षित आहे.