Pu La Deshpande Birth Anniversary : अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार, संगीतकार... कित्येक पिढ्यांना खळखळून हसवणारे पु. ल. देशपांडे!
Pu La Deshpande : मराठी साहित्य व संगीतातील योगदानाव्यतिरिक्त पुलंचे आकाशवाणी, दूरदर्शन, सिने-नाट्य क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे.
Continues below advertisement
Pu La Deshpande
Continues below advertisement
1/10
'बटाट्याची चाळ', 'असा मी असा मी', 'व्यक्ती आणि वल्ली', 'खोगीरभरती', 'पुरचुंडी', 'नस्ती उठाठेव', 'गोळाबेरीज', 'हसवणूक' ही पुलंची गाजलेली पुस्तकं आहेत.
2/10
पु. ल. देशपांडे यांनी अनेक अजरामर नाटकं लिहिली आहेत. काही इंग्रजी नाटकांचे त्यांनी मराठीत भाषांतर केले आहे.
3/10
पुलंनी 1948 साली 'तुका म्हणे आता' हे पहिलं नाटक लिहिलं आणि त्यांचं पहिलचं नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं.
4/10
पुलंची 'तुझे आहे तुजपाशी', 'भाग्यवान', 'सुंदर मी होणार' ही नाटकं लोकप्रिय ठरली आहेत.
5/10
पुलंच्या नारायण, हरितात्या, पानवाला, म्हैस, पाळीव प्राणी, रावसाहेब अशा अनेक कथा आजही अनेकांना तोंडपाठ आहेत
Continues below advertisement
6/10
1947 ते 1954 या काळात पु. ल. देशपांडे यांनी अनेक सिनेमांसाच्या कथा, पटकथा, काव्य, संगीत, अभिनय आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली.
7/10
'वंदे मातरम', 'दूधभात', 'गुळाचा गणपती','भाग्यरेखा' हे पु. ल. देशपांडे यांचे गाजलेले सिनेमे आहेत.
8/10
पु. ल. देशपांडे यांचा 'देवबाप्पा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या सिनेमातील 'नाच रे मोरा' हे गाणं चांगलचं लोकप्रिय झालं.
9/10
पु. ल. देशपांडे यांनी 'अंमलदार', 'गुळाचा गणपती', 'घरधनी','चोखामेळा','दूधभात', 'देव पावला', 'देवबाप्पा', 'नवराबायको', 'नवे बिऱ्हाड', 'मानाचे पान' आणि 'मोठी माणसे' या अकरा सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.
10/10
'गुळाचा गणपती' सिनेमातील 'इंद्रायणी काठी' या भीमसेन जोशींनी लोकप्रिय केलेल्या गाण्याचं संगीत पु.ल. देशपांडे यांचं होतं.
Published at : 08 Nov 2022 01:30 PM (IST)