Tripurari Purnima : त्रिपुरारी पौणिमेनिमित्त पंढरपूरचे विठ्ठल मंदिर आणि अकलूजच्या आकलाई मंदिर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळले
Pandharpur News : अकलूज येथील अकलाई मंदिरात देखील पाच लाख पणत्यांचा वापर करून अनोखा दीपोत्सव साजरा करण्यात आला होता.
Pandharpur News
1/10
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विठ्ठल मंदिराला लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून टाकण्यात आले होते .
2/10
आषाढ शुद्ध एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा हा चार महिन्याचा अर्थात चातुर्मास संपवून देवाला जागे करण्यासाठी भगवान शंकर येतात आणि विष्णूचा कारभार भगवान शंकर त्यांच्या ताब्यात देतात अशी पुराणात मान्यता असल्याने या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे
3/10
काल रात्री विठ्ठल मंदिराला आधी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
4/10
यानंतर मंदिर आणि मंदिर परिसरात रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या.
5/10
संपूर्ण विठ्ठल मंदिर आणि मंदिर परिसरात लाखोंच्या संख्येने पणत्या लावून संपूर्ण मंदिर परिसर उजळवून टाकण्यात आला होता .
6/10
अकलूज येथील अकलाई मंदिरात देखील पाच लाख पणत्यांचा वापर करून अनोखा दीपोत्सव साजरा करण्यात आला होता.
7/10
यावेळी अकलाई मातेचे पूजन जयसिंह मोहिते पाटील यांनी सपत्नीक केले.
8/10
या पूजेनंतर अकलूज पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शन घेत मंदिर परिसरात इच्छेनुसार पणत्या लावत या दीपोत्सवात सहभाग घेतला .
9/10
चंद्रग्रहणाच्या कालावधीत विठ्ठल मंदिरात भाविकांना दर्शन खेळे असणार असून ग्रहण लागताना आणि ग्रहण सुटताना देवाला चंद्रभागेच्या पाण्याने स्नान घातले जाणार असल्याचे मंदिर पुजारी समीर कौलगी यांनी सांगितले .
10/10
ग्रहण काळात देवाचे दर्शन सुरु राहणार असून केवळ अभिषेक कालावधीत पदस्पर्श दर्शन बंद राहून मुखदर्शन सुरु राहिल असे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुडाळवंड यांनी सांगितले
Published at : 08 Nov 2022 11:20 AM (IST)