In Pics : नवले पुलावर अतिक्रमण कारवाईचा हातोडा
नवले पुलाजवळ रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातानंतर अनेक महत्वाचे निर्णय घेणार असल्याचं चित्र आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्याची सुरुवात या परिसरातील अतिक्रमणावर कारवाई करत केली आहे.
100 पोलिसांच्या बंदोबस्तात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे.
या पुलाची रचना चुकली असल्याचंदेखील एनएचएआयने मान्य केलं आहे.
त्याचप्रमाणे सातत्याने होणाऱ्या अपघाताबाबत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अधिकाऱ्यांना यापूर्वी देखील खडसावलं होतं.
मात्र यासंदर्भात कोणतंही पाऊल उचललं गेलं नाही. त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलं. आतापर्यंत या पुलाने अनेकांचा जीव घेतला आहे. मात्र रविवारी झालेल्या अपघातानंतर प्रशासनाला जाग आली आहे.
आज सकाळपासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाईला सुरुवात केली आहे. यासाठी शेकडो कर्मचारी यांनी कामाला सुरुवात केली आहे.
100 हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले होते.