भारतातील पहिली LNG नॅचरल गॅसवर चालणारी बस, नागपुरात झाली निर्मिती
प्रदूषण मुक्त भारत (Pollution Free India) या मोहिमेअंतर्गत भारतातील पहिली एलएनजी म्हणजेच लिक्विडीफाईड नॅचरल गॅस (LNG) वर चालणारी बस नागपुरात तयार करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलवकरच भंडारा जिल्ह्यातील मासाळ येथे बायो एलएनजी प्लांट तर नागपूर आणि रायपूर येथे एलएनजी स्टेशन उभारून मध्यभारतात एलएनजीची उपलब्धता कमालीची वाढणार आहे.
भारतातील पहिली एलएनजी म्हणजेच लिक्विडीफाईड नॅचरल गॅस वर चालणारी बस नागपुरात तयार करण्यात आली आहे.
महिंद्रा कंपनीची ही बस मुळात डिझेलवर चालणारी होती.
मात्र गो बस' या कंपनीने डिझेलवर चालणाऱ्या या बसला एलएनजी वर चालणाऱ्या बसमध्ये रूपांतरित केलं आहे.
सुमारे अकरा लाख रुपयांचा खर्च यासाठी आला आहे.
डिझेलऐवजी एलएनजी वर चालणाऱ्या बसमुळे इंधनावर लागणारा खर्च अनेक पटींनी कमी होईल असा कंपनीचा दावा आहे.
सध्या नागपुरात सुरू असलेल्या ऍग्रो व्हिजन या कृषी प्रदर्शनात ही बस लोकांच्या आकर्षणाचा केंद्र ठरत आहे.