In Pics : जाणून घ्या महात्मा गांधी यांच्या हत्येचे समर्थन करणाऱ्या कालीचरण महाराजबद्दल
Who is Kalicharan Maharaj : महात्मा गांधींवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालिचरण महाराजाविरोधात छत्तीसगडमध्ये गुन्हे दाखल झालेत. रायपूरमधील धर्मसंसदेत केलेल्या भाषणात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. (photo:shri_kalicharan_maharaj/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहात्मा गांधींवर टीका करताना त्यांनी नथूराम गोडसेचे गोडवे गायले आहेत. कालिचरण महाराज हे मूळचे अकोल्याचे रहिवाशी आहेत. (photo:shri_kalicharan_maharaj/ig)
अकोला जुने शहरातील शिवाजीनगर भागातल्या भावसार पंचबंगल्याजवळ त्यांचे कुटुंबीय राहतात. बालपणीच अध्यात्माकडे वळलेल्या कालिचरण यांचं मूळ नाव अभिजीत सराग असे आहे. (photo:shri_kalicharan_maharaj/ig)
'कालीचरण महाराज' अकोल्यातील जूने शहर भागातील शिवाजीनगर मध्ये 'भावसार पंचबंगला' भागात राहतात. अकोल्यातील तरुणाईमध्ये या महाराजांची मोठी क्रेझ आहे. (photo:shri_kalicharan_maharaj/ig)
लहानपणी अभिजीत अत्यंत खोडकर होता. शिक्षणाचे आणि अभिजितचे सख्य फारसं जमले नाही. त्याला शाळेतही जाण्याचा कंटाळा यायचा. लहानपणापासून त्याचा ओढा अध्यात्माकडे अधिक होता. त्यातही तो कालीमातेची आराधना करायचा. घरच्या मंडळींना तो शिकावा आणि काहीतरी वेगळं काम करावे असे वाटायचे. मात्र, या परिस्थितीतही त्याचा अध्यात्मावरचा विश्वास आणि ओढा वाढत गेला. (photo:shri_kalicharan_maharaj/ig)
पुढे अभिजीतचा 'कालीपुत्र कालीचरण' झाला. पुढे लोकांनी त्यांना 'महाराज' असे संबोधने सुरू केले. या कालिचरण महाराजाने 2017 मध्ये अकोला महापालिकेची निवडणूक लढवली होती. मात्र, पराभवाचे तोंड पाहावे लागले. (photo:shri_kalicharan_maharaj/ig)
जवळपास दीड वर्षांपूर्व कालीचरण महाराजाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत कालीचरण महाराजाने तन्मयतेने सुंदरपणे शिवतांडव स्त्रोत गायले होते. एका तरुण साधूने गायलेल्या या शिवतांडव स्त्रोतामुळे कालीचरण महाराज अधिक प्रसिद्ध झाला. मध्यप्रदेशातील भोजपुर येथील एका शिवमंदिरात हे 'शिवतांडव स्त्रोत' गायलं होतं. या व्हिडिओनंतर महाराजाची लोकप्रियता प्रचंड वाढली होती. (photo:shri_kalicharan_maharaj/ig)
कालीचरण महाराजाने २०१७ मध्ये झालेल्या अकोला महापालिका निवडणुकीत आपलं नशीब आजमावलं होतं. मात्र, कालीचरण महाराजाचा या निवडणुकीत पराभव झाला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम मतदारसंघातून त्यांच्या उमेदवाराची मोठी चर्चा झाली होती. मात्र, त्यांनी ही निवडणूक लढवली नाही. (photo:shri_kalicharan_maharaj/ig)