Monsoon Trek: पावसाळ्यात ट्रेकिंगला जाताय? तर घ्या 'या' गोष्टींची काळजी
ज्या भागात ट्रेकिंगला जाणार आहात त्या भागाची आणि तेथील वातावरणाची पुरेपूर माहिती घ्या. ते ठिकाण नेमकं कुठे आहे, तिथे पोहोचाल तेव्हा तिथे थंडी असेल की पाऊस या सर्वाती अचूक माहिती घ्या आणि त्याप्रमाणे कपड्यांची आणि इतर गोष्टींची जुळवाजुळव करा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकधीही एकट्याने ट्रेकिंग करु नका. ट्रेकिंग ही अत्यंत काळजी घेऊन करण्याची गोष्ट असते आणि तिथे कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं, त्यामुळे काही अनर्थ ओढवल्यास आपल्यासोबत एखादी व्यक्ती असल्यास तिची मदत होऊ शकते.
ट्रेकिंगला जाताना पाठीवर जास्त ओझं घेऊन जाऊ नका. डोंगरावर चढाई करताना पाठीवर असणाऱ्या बॅगेत शक्यतो कामी येतील अशाच वस्तू ठेवा. छोटा चाकू, टॉर्च, खाण्यापिण्याचं सामान, चांगल्या प्रतीचे बूट अशा गोष्टी बॅगेत ठेवा.
ट्रेकिंगला जाताना कधीही मोबाईलवर जास्त अवलंबून राहू नका, अनेकदा डोंगराळ भागात मोबाईल काम करत नाहीत, त्या ठिकाणी मोबाईलला रेंज देखील नसते.
रात्री ट्रेक करत असाल तर फुल पॅन्ट, फुल शर्ट घाला. रात्रीच्या वेळेस किटकांची भीती असते, अशा वेळी पूर्ण कपडे तुम्हाला त्यांच्या डंखापासून वाचवू शकतात.
ट्रेकिंगला जाताना आधी आपल्या तब्येतीची काळजी घ्या. डोंगरदऱ्यांमध्ये जाऊन तुम्ही आजारी पडलात तर तुमच्या जवळ कोणती औषधं असावी याचीही माहिती घ्या आणि फर्स्ट एड किट बाळगा.