'धागा धागा अखंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया'; रंगीबेरंगी धाग्यांपासून साकारलं लाडक्या विठ्ठलाचं मोहक रूप
संपूर्ण पंढरी विठ्ठलाच्या नामघोषात दुमदुमुन गेली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशातच आषाढी एकादशीचं औचित्य साधत सिंधुदुर्गच्या मालवणमधील एका मुलीनं रंगीबेरंगी धाग्यांनी विठ्ठलाचं सुंदर रुप साकारलं आहे.
श्रेया चांदरकर हिनं धाग्यापासून विठ्ठलाचं रूप साकारल आहे.
श्रेयानं साकारलेलं विठ्ठलाचं रुप पाहून गीतकार पी. सावळाराम यांच्या ओळी आठवतात.
'धागा धागा अखंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया', असं म्हणत गीतकार पी. सावळाराम यांनी विठुरायाचं सुंदर वर्णन केलं आहे.
गीतातून करण्यात आलेल्या विठ्ठलाच्या वर्णनाप्रमाणे विविध रंगांचे धागे एक-एक धागा जोडत श्रेयानं ही प्रतिकृती साकारली आहे.
चित्रवारीच्या माध्यमातून श्रेया चांदरकर हिनं विविधरंगी धाग्यांपासून सावळ्या विठुरायाचं चित्र रेखाटलं आहे.
डोक्यावर पांघरलेली शाल, त्यातून डोकावणारं मोरपीस, शुभ्र लाल रंगाचा अंगरखा, त्यावर रुळणाऱ्या मोत्यांच्या माळा आणि चेहऱ्यावरील प्रसन्न मुद्रा असं विठुरायाच सुंदर रूप धाग्यापासून साकारलं आहे.
श्रेयानं साकारलेली विठुरायाची प्रतिकृती पाहून मन हरपून जातं.